आभासी दुनियेतील मैत्री
आभासी दुनियेतील मैत्री
1 min
335
तुझ्यासह मैत्रीचे नाते आज अधिकच घट्ट झाले
आभासी दुनियेच्या मैत्रीचे धागे जसे सैल झाले |
किती मित्र या आभासी दुनियेत मी जोडले होते
श्रद्धांजलीस माझ्या येथे ना कोणीच हजर होते |
माझ्या अंगणातील फुलझाडेही कोमेजली होती
एका वादळी पावसाने ती मातीत गाडली होती |
त्या झाडावरील फुलेही मातीत मिसळली होती
श्रध्दांजली वाहणारी ओंजळ मात्र रिकामी होती |
आभासी या दुनियेमधे होते आभासीच सारे मित्र
उचलण्यास मजला हजर होते माझेच बाल मित्र |
मैत्री माझ्या बाल मित्रांची कोणासही कळणार नाही
आभासी मित्रांकडून असं प्रेम कधीच मिळणार नाही |
