विचित्र विडंबना
विचित्र विडंबना
1 min
210
सरला वर्षा ऋतू जरी पाऊस अजून आहे
दोन घोट पाण्यासाठी कोठे पायपीट सुरु आहे ।
आश्र्वासने जी पोकळ खरी मानून बसलो
दोन वेळच्या भाकरीची भ्रांतही अजून आहे ।
विश्र्वस्त शिर्डी तिरुपतीचे संपत्ती मोजून थकती
देवघरातील समईमधे ना वात ना तेल आहे ।
कोठारे या देशातील धनधान्याने भरुन गेली
लेकरे असंख्य येथील तरी ऊपाशी झोपून गेली ।
जगतोय या जगी मी मरणेही महाग झाले
ना विषही स्वस्त येथे ना विहीरीत पाणी आहे ।
तक्रार कुणी का करावी सर्व सुरळीत आहे येथे
फासून शेंदूर दगडास आम्ही देव बनवला आहे ।
अजूनही या काळजातून धडधड ऐकू येत आहे
रक्त या काळजातील मात्र कधीच गोठले आहे ।
