खरंच काही
खरंच काही
मैत्री करते मनावर उपचार
नाही लागत तेथे औषधोपचार
शरीराची जखम मलमपट्टीने बरी
मनाची जखम गोड शब्दांनी बरी
काटा टोचला तर पाय रक्त बंबाळ
शब्द टोचला तर मन होई घायाळ
काटा टोचला तर काढता येतो
शब्द टोचला तर मनात राहतो
आकाशातून मेघ बरसती
पावसापासून छत्री रक्षण करती
डोळ्यातुन अश्रू वाहती
पुसण्यास कोण पुढे येती
मेल्यावर तू काय नेशी
स्वप्न भंगल्यावर काय करशी
एकमेकांना साद देशी
संकटातून तू सावरशी
अहंकाराने तू फुलशी
गर्वाने तू विनाश ओढवशी
हक्काने तू जर बोलावशी
मित्रगणांशी हितगुज करशी
