STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Inspirational Thriller

3  

Rohit Khamkar

Classics Inspirational Thriller

खरं

खरं

1 min
217

माझ सगळंच जुनं, नवं न्हाई माझ्याकड

बारीक द्रुष्टी तुमची, निरीक्षण सारं तुझ्याकड


बरं जाणवतो मला हल्ली, दर्जा खालावलेला

मध्यमवर्गी काय लिहिणार, आत्मा ज्याचा मेलेला


बाकी काही न्हाई हो, फक्त आठवणी अनं स्वप्न मांडतो

वेळे सोबत जगताना, आयुष्याचे क्षण थोडे सांडतो


साहित्य काय माहीत नाई, फक्त ऐकून आहे

दाखवायचंच कोनाला, अजेंडा स्वतःसाठी लिहिण्याचा आहे


हरकत नाही कि दुखः, जमत नसेल मला

पण नवरस जिवन जगण्या, मार्ग आहे खुला


लिहितो सारं मनातल, वाटतं तेव्हा बरं

आशा स्वप्न प्रयत्न कि काय, सारं आहे ते खरं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics