खरं सांग
खरं सांग
खरं सांग मला तू
माझं काही चुकलं का
काय करणं राहून गेलं
काही कधी हुकलं का || 0 ||
सोबत असून सोबत नसतेस
का तू अशी हरवलेली
विचारांची तुझी दिशा
वाटते मला ठरवलेली
कधी तूझ्या मनातलं
सांग सखे मुकलं का
काय करणं राहून गेलं
काही कधी हुकलं का || 1 ||
सांग मला तू मुक्तपणे
कधी काय चूक झाली
कधी सर्वांसमोर असेल
सांग कधी मुक झाली
माझ्या काही विचारांनी
मन तुझं दुखलं का
काय करणं राहून गेलं
काही कधी हुकलं का || 2 ||
कोण तूला काय बोललं
कुणी तूला दुखावलं
काय तूला आवडतं आणि
कशाने मन सुखावलं
कुणी तुझ्याविरुद्द
रणशिंग फुकलं का
काय करणं राहून गेलं
काही कधी हुकलं का || 3 ||
काही जण बेछूट असतात
अगदी जसं श्वान
ठेवत नाहीत कोणाचाही
समाजात मान
कुणी तुझ्यावर प्रिये
कुत्र्यासारखं भुकलं का
काय करणं राहून गेलं
काही कधी हुकलं का || 4 ||

