STORYMIRROR

Sayli Kamble

Tragedy

4  

Sayli Kamble

Tragedy

खरी कमाई

खरी कमाई

1 min
517

आयुष्य जाते धावण्यात संपत्तीच्या मागे

कितीही कमावले तरी भूक ना भागे


संपत्ती वाढली की गरजही वाढत जाते

हया जीवनचक्राला काही अंतच नसे


वैभव कमावणे ह्यात काहीच गैर नाही

पण त्यापाई समाधान गमावले हे ध्यानीही येत नाही


कायम तुलना करत राहतो आपण सर्वांसोबत

अजून धावतो सर्वश्रेष्ठ बनण्याचे ध्येय बाळगत


ह्यातले काही सोबत नेता येत नाही अंतिम समयी

त्यामुळे आहे त्यातच आनंद माना हिच खरी कमाई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy