खरी गरज
खरी गरज
स्वतःला शोधणं फार अवघड आहे
पण ते अशक्य नाही.
हरवलेली वस्तू सापडते
पण आपण स्वतःलाच हरवलो तर पुन्हा सापडणं कठीण आहे.
आजकाल गरज आहे स्वतःलाच ओळखण्याची
नकारात्मक विचारांच्या गर्दीला मागे टाकून
स्वतःमधील सकारात्मकतेचा किरण शोधण्याची
पाय खेचायला सारेच आहेत,
पण आपल्याला बोट कोण देतंय हे ओळखायला यायला पाहिजे
आणि आता गरज आहे माणसातील माणुसकी ओळखण्याची
अपमान झाला तरी संतुलन न बिघडता
पुन्हा ताठ मानेने जगण्याची हिम्मत करायची
आयुष्य खूप छोटस आहे ,कायम नकारात्मकेत रुजायला
त्यामुळं सदैव प्रसन्न आनंद आत्मसात करण्याची गरज आहे
इथं प्रत्येकाला हीच गरज आहे....
