खपली
खपली
जखमांच्या वेदनांना लपविते खपली
साकळल्या नात्यांनाही लपविते खपली
भळाळेल जुनी स्मृती प्रयासाने रोखली
दुःख उजळवणारी काढू नये खपली
दुःखे पाहता आनंद सुखे कुणा खुपली
मानभंगाने मात्र अकाली स्वप्ने खपली
उपचार वरवरचे बाजारी खपली
काळाच्या मलमाने होती धरली खपली
आपोआप विरली आस्था सरता सावली
वाहिली वादळे अस्तित्वे ढगांची खपली
