खोपा-कविता
खोपा-कविता
काडी काडी चा खोपा
विणला मोठ्या कष्टाने
झाडाच्या फांदीला मोठेपण
दिले एका चिमणीने
तिचे घरटे निवारा
अनेक संकटात आधार
त्यात तिची चिलेपिल्ले
कष्टाने उभारीला संसार
काडी,काडी जमा करून
आणते निसर्गातून फिरून
विणले सुंदर टुमदार घरटे
तिच्या कष्टाच्या जिद्दीन
फांदीवरचा लोंबता खोपा
घेती मोकळा श्वास
गाठून यशाचे शिखर
पूर्ण केला त्यांचा ध्यास
मारते आकाशी भरारी
रात्री येते पिल्लांपाशी
भरविते तिच्या पिल्लांना
दिवसभर अन्नाच्या शोधाशी
कष्टमय जीवन पाखरे
पाहती आपल्या आईचे
तिच्यासारखे जगण्यास
मन होई एकदाचे
लागे हुरहुर कष्टाची
प्रयत्न करती उडण्याची
जेव्हा येते बळ पंखात
लागे चाहूल जगाची
स्वावलंबी त्यांचे जीवन
खूप आनंदी होतात
मजबूत त्यांच्या पंखांनी
गगनी भरारी मारतात
तिन्ही ऋतूंचे जीवन
आवाहन कष्टमय जगणं
संघर्ष,धोका पत्करून
जगतात मोठ्या हिंमतीनं
