खंत
खंत
रांगत घर दूडुदूडु धावत रहातं
लहानग्या पावलांनी शाळेला जातं
पंखात बळ आलं की चहूदिशांनी धावू लागतं
नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतं
आणि दिवसातले अधिकाधिक तास कुलूपबंदच रहातं ...
पहाटेपासून जागं झालेलं घर दुपारी झोपाळतं
संध्याकाळी दाराभोवती रेंगाळत रहातं जेवणाच्या घमघमाटात अन् उदबत्तीच्या सुगंधात
रात्रीसाठी सज्ज होतं ,कुटुंबाची वाट पहात रहातं,
तेव्हा घराच्या भिंती टी व्ही ,रेडीओच्या आवाजात आपला आवाज मीसळू लागतात,
अन् मंद प्रकाशात न्हाउन निघतात
अन् पुस्तकाच्या सहवासात झोपी जातं...
किल्ली अन् कुलपाला कंटाळलेले घर माणसांची वाट पहात रहातं ,
सुट्टीच्या दिवसांसाठी आसुसलं होतं
ते दिवसही तसेच निघून जातात,
आउटींगच्या मजेत घरधनी घराबाहेरच रमतात ...
हातातल्या किल्लीला साध्याशा रिंगमध्ये गुंतून घरातल्या भिंतीवर दारामागच्या कोपर्यात छोटीशी जागाही मीळवता आली नाही याचेच दु:ख वाटत रहातं...
फक्त अडी अडचणीच्या वेळी घराला सुरक्षितता देणं हेच तीचं काम तीला आठवत रहातं...
नाइलाजाने घराबाहेर रहाताना ,
तीच्या नशिबी या हातातून त्या हाती झुलणं हेच येतं...
तीच्या नशिबी या हातातून त्या हाती झुलणं हेच येतं...
