खळगी
खळगी
विस्कटत पसरत गेले
बिचकत धडकत संपले
वीणा सहारा विनापहारा
मोळीनचा उचली भारा
कापत ओरबडत रोवले
मुकाट पदरात खोवले
नाकापेक्षा मोती जड
उंच अपेक्षा हाती फड
मांडल्या चुली भूमीत
रुतल्या चाली अगणित
खळगी पोटाची भलतीच
हाती मात्र खुरपीच
नाही कसलं भय
मोजत नाही समय
