STORYMIRROR

Vinodini Vartak

Abstract

3  

Vinodini Vartak

Abstract

खेळ शब्दांचा

खेळ शब्दांचा

1 min
199

 खेळ नसती निव्वळ

 बैठकीत मैदानात

वही लेखणीचा पहा 

खेळ जमे लिखाणात


 साहित्यात एकंदर

खेळ असे तो शब्दांचा

 पूर येतो कल्पनेला

पसाराच विचारांचा 


शब्द भंडार हवाच

रमताना काव्य ओळी छं

द वृत्त यमक हीह

हवे मनी सदा काळी 


 गद्य पद्य वाङमयाचे 

असे किती ते प्रकार 

 खेळ करुनी शब्दांचा 

 होई साहित्य साकार 3 


 जुळवूनी शब्द शब्द

होते तयार लिखाण 

असो मग गद्य पद्य 

शब्दांचीच असे खाण 


मूल्य सर्वदा शब्दांचे 

जाणे शब्द शिल्पकार 

शब्द ओविता उचित 

 करी तो शब्दाविष्कार


 भाषा नटविण्या हवे 

शब्दांवर ते प्रभुत्व 

खेळ शब्दाचा मांडता 

जाणा शब्दाचे महत्त्व


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract