STORYMIRROR

Vinodini Vartak

Romance Others

3  

Vinodini Vartak

Romance Others

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
119

शरदाच्या चांदण्यात

वेध गुलाबी थंडीचे

थंड गारवा तो सांगे

दिन आले शेकोटीचे


शहारती तृणपाती

दव थेंब चमकती

भासे मोतियांच्या माळा

पुष्प लता बहरती


वेध लागता थंडीचे

ऐकू येतो तो मारवा

प्रेमी युगलांंना वाटे

सदा हवा हा गारवा


 दिन येताची थंडीचे

तरारेल भाजी पाला

मस्त सेवन करुया

गुणकारी आरोग्याला


 करी आठवण थंडी

शोधा कपडे गरम

थंडी दूर सारण्यात

नको प्रकृती नरम


ऋतू प्रीतीचा लोभस

निसर्गाची ती करणी

दिसतील धनधान्ये

केल्या कष्टाची भरणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance