STORYMIRROR

Vinodini Vartak

Action Others

3  

Vinodini Vartak

Action Others

कुठलाही हंगाम पानगळ

कुठलाही हंगाम पानगळ

1 min
148


  येते ऐकू एका वेळी

  सळसळ ही पानांची

  सुरु होता पानगळ

  शोभा जाते त्या वृक्षाची 


  होता पाने ती पिवळी

  जागा करी हिरव्यास

  नियमच तो सृष्टीचा   

  होत नाहीत उदास   


 घेत गिरक्या पडते

 पान पिवळे भु -वरी

 मिसळूनी मातीतूनी

 खतासाठी काम करी   


  सहा ऋतूंचे सोहळे 

 अपूर्वाई निसर्गाची

  वर्षा दावी हिरवाई 

  सृष्टीवर तारुण्याची..


  शरदात पानगळ 

  निस्तेजता वृक्षावरी   

  पाचोळ्याचा पसा-याने                   

  पीत रंग भुभीवरी


  येतो वसंत डौलाने    

  संपतेच मरगळ

  बहरती वृक्ष पुन्हा 

  विसरुनी पानगळ  


   



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action