आला आला पावसाळा
आला आला पावसाळा
1 min
10
कृष्ण मेघांना पाहूनी वाटे हायसे मनाला*आला आला पावसाळा*हर्ष दाटतो बळीला. 1
उडे पाचोळा सर्वत्र वाहे सोसायट्याचा वारा मेघ गर्जती अंबरीसुरु झाल्या वर्षाधारा 2
कधी पडे रिमझिम पहा झिम्माड पाऊस नद्या वाहे खळखळभिजण्याची संपे हौस 3
कड्यातून वाही झरे भासे शुभ्र दुग्ध धारा हास्य लोभस निसर्ग गीत गाई मंद वारा 4
येता श्रावण बरसे रिमझिम जलधारा सरी वर सरी येती थंड गार झोंबे वारा 5
रुप पहा वसुधेचे कसे दिसे मनोहर जणू हिरवे गालिचे भासे सर्वत्र सुंदर 6