गुलाबी थंडी (कोणताही हंगाम)
गुलाबी थंडी (कोणताही हंगाम)
1 min
205
शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड गारवा तो सांगे
दिन आले शेकोटीचे
शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती
वेध लागता थंडीचे
ऐकू येतो तो मारवा
प्रेमी युगलांंना वाटे
सदा हवा हा गारवा
दिन येताची थंडीचे
तरारेल भाजी पाला
मस्त सेवन करुया
गुणकारी आरोग्याला
करी आठवण थंडी
शोधा कपडे गरम
थंडी दूर सारण्यात
नको प्रकृती नरम
ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी
