कुटुंब
कुटुंब
ठेवू भाव एकात्मतेचा
नाते राखूया
बंधूत्वाचे दिधले आभाळ एक ची छत
जपण्या नाते विश्व कुटुंबाचे 1
दीन अती पतीतांना
साथ उच नीच तेला
नको मनी ठाव सर्वा देवू मदतीचा हात
मनी जपूया समतेचा भाव 2
ठेवू जाण आपण सारे बांधव
मानवता हाची खरा धर्म
एकदुजांना करुनी सहाय्य
प्रेम देणे जगताला हेची कर्म 3
दिधलेली संतांची शिकवण
आहे महान संस्कृतीचा
आरसा नुरते फिरणे
समतेच्या शोधात असता
विश्व-कुटुंब भावनेचा वारसा 4