खेळ सावल्यांचा
खेळ सावल्यांचा
सावल्या विखुरल्या समोर भिंतीवर
अलगद बसले कोणी झाडावर
कमी उजेड खूप अंधार
हवा सुटली भयानक गार
लांब लांबपर्यंत रस्ता नाही
वाटेत कोणीतरी उभा राही
मिणमिणत्या मेणबत्तीचा उजेड कमी
येत नाही कसल्या कामी
गच्चीचा वावर जिथे संपतो
सावल्या सावल्यांचा खेळ चालतो
कोण निघत असेल अंधारात
रात्रभर पडले मी विचारात

