STORYMIRROR

Shila Ambhure

Drama

3  

Shila Ambhure

Drama

खेळ बुद्धिबळाचा

खेळ बुद्धिबळाचा

1 min
710



राजा मी बुद्धिबळाचा

राज्य माझे चौकतीचे

आठ प्यादे, हत्ती, घोडे

सैन्य शोभते उंटांचे


एक चाणाक्ष वजीर

असे सदा उभा सज्ज

काळ ठरे शत्रूसाठी

राहे निश्चिंत हे राज्य


प्रतिस्पर्धी दोन राजे

लढवय्ये वजीर ते

होई जीत एकाची नि

दुसऱ्याची हार होते


शत्रूराजा करी हल्ला

होते वैरीण ती रात

राजा जरी असलो मी

मिळे मला , शह , मात


जन्म अपुला साऱ्यांचा

बुद्धिबळाचाच खेळ

जरी जिंकलो हरलो

सुखी व्हावे सर्व वेळ.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama