STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Action Classics

4  

Supriya Devkar

Tragedy Action Classics

खडतर प्रवास

खडतर प्रवास

1 min
359

खडतर वाटे प्रवास जीवनाचा 

तरीही जगणे थाबंत नाही 

कुठवर घाबरावे प्रारब्धांना

मनाचा थांग लागत नाही 


खूळचट वागणे नकोच आता 

थेट वर्मी घाव करावा 

सत्याच्या लढाईचा प्रकाश 

अग्रस्थानी उरावा 


खुशाल मांडावे म्हणणे आपूले 

का दडपाव्या भावना 

दबावाखाली जगता वेदनेचा 

का करावा सामना


खंत का वाटावी मनाला 

काही चुकले नसताना 

आयुष्याच्या वाटेवरती 

स्वप्ने दूरवर दिसताना 


खऱ्या आयुष्याचे जरी 

चित्र असेल वेगळे 

आपल्याच हाती असती 

जगण्याचे सोहळे 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy