STORYMIRROR

Murari Deshpande

Comedy

3  

Murari Deshpande

Comedy

खड्डे असेच राहो

खड्डे असेच राहो

1 min
707

खड्डे दुरुस्त करण्यात मजाच नाही काही

खड्डेच शिकवतात आपल्याला ‘पावलोपावली’काही


उगाच धराल आग्रह बुजवाल टाकून भर

फार मोठ्या ‘शिकवणी’ला तुम्ही मुकाल तर


उदात्त हेतू शासनाचा लोकहिताचा त्यापाठी

आकांडतांडव नका करू  बुजवून टाकण्यासाठी


ग्रामपंचायत ते महापालिका हाच समान धागा

हुशार माणसेच शोधू शकतात चालण्यासाठी जागा


सपाट रस्त्यावर चालण्यात कसली आलीय कला

खाचखळगे चुकवील तोच नागरिक भला


खड्डे शिकवतात आपल्याला जोरदार दणके सोसायला

विकासाची भाषणे देत ठेकेदारांना पोसायला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy