STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational

4  

Vijay Sanap

Inspirational

खारुताई

खारुताई

1 min
695


।। खारुताई ।।

( बालकाव्य )

खारुताई खारुताई

कुठे आहे तुझं घर

पळे ईकडून तिकडे

झाडं चढे भरभर ।।


खारुताई खारुताई

अंगा काळे पांढरे पट्टे

दिसे फार नक्षीदार

जनु काही रांगोळी वाटे ।।


खारुताई खारुताई

तुझ्या शेपटीचा गोंडा

भासे मला जसा काही

माझा तिरंगी झेंडा ।।


खारुताई खारुताई

आपण खेळूया जरा

तुझ्या संगे वेळ माझा

जाईन आज बरा ।।


खारुताई खारुताई

बोल ना गं मला

घर भर भांडे मी

खाऊ देईन तुला ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational