कॅन्डल लाईट डिनर....
कॅन्डल लाईट डिनर....
कित्येक दिवस तुझं- माझं
गणितच नाही जुळलं
कॅन्डल लाईट डिनरचा
बेत आखायच ठरलं....
सर्व केल प्लॅनिंग
अन् सरप्राईज द्यायच म्हंटल
तुझ्यासोबत करून ट्यूनिंग
एकांतात राहायच सुचलं....
ड्रेसिंग केल झक्कास
अन् फोन करायच म्हंटल
आजचा दिवस साला भकास
नेमक रीचार्जच संपल....
शेवटी खटाटोप केला खास
शेजाऱ्याला फोन दे म्हंटल
आता ठरवलं नाद तुझा बास
नाही म्हणून माझ केलस वांग भरलं....!
