कधी असं घडाव
कधी असं घडाव
कधी असं घडाव
आज बाबांनी सुट्टी घ्यावी
आणि आई च्या जागेवर काम कराव
आई ने ते पाहून हसत राहावं
कधी असं घडाव
मित्रांनी स्वतःहून पार्टी
करूयात का विचाराव
कधी असं घडाव
आई बाबांनी मोबाईल
वरून टोमणे मारणे बंद करावे
कधी असं घडाव
सरांनी कॉलेज सुरु झाले
की वह्या पूर्ण करण्यासाठी सांगावे
कधी असं घडाव
ह्या जगात सगळे
जण आनंदात राहावे
