कौतुक
कौतुक
रोज नित्य नियम करून
देवासमोर उभा हात जोडून
पाळायचे नियम धपाटा कायम
वाणीवर ठेवावा लागे संयम
चालत नव्हतं खोटं बोलणं
उलट्या उत्तरांना मुस्काटात मारणं
बरीच कडक शिस्त असायची
सर्वांनी एकत्र हसून पाळायची
पुढचं बोलायची हिंमत नसायची
ऐकलं म्हणून शाबासकी मिळायची
शाबासकीसाठी न्हवता चॉकलेटचा पुडा
कौतुकाने भरी पापण्यांच्या कडा
