STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

4  

Umakant Kale

Tragedy

कौटुंबिक क्षणाची आठवण

कौटुंबिक क्षणाची आठवण

1 min
447

आयुष्याच्या पुस्तकात

काही क्षण आजही

तसेच जपून ठेवले आहे.

कौटुंबिक क्षणाची आठवण

आजही तशीच मला

ताजी दिसली आहे.

पुर्वी आई वाढदिवसाला

रोज सकाळी ओवाळायची

मायेने खूप जवळ घ्यायची....


तिचा मी एक राजकुमार

काय झाले धनदौलत जरी नसली तरीही ?

तरी तिला नेहमीच वाटायचं

कुठे आकाशातील तारे

तोडावी ,अण् माझी दृष्ट काढावी..

आईची ती भोवळी माया 

हल्ली तो दिवस उगवतच नाही

तारीख येते पण तो दिवस

आर्शिवादाने भरपूर काढणारी

माय आज फोटोत आहे...


ती शब्द आणि भावना

जणू काळाच्या पडद्याआड

कायमचे मुके झाले.

आणि मी पोरका झालो.

तरीही आठवणीची

शिदोरी कायमस्वरूपी

मी अशीच चाखत असतो.

कायम ते पान उघडून

ह्दयात नेहमीच जपत असतो..

नेहमीच तिला ही तसच

जपतो प्रेमाने माझ्या ह्दयात.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy