STORYMIRROR

Sunita Ghule

Romance

3  

Sunita Ghule

Romance

काय पाहिलेस माझ्यात

काय पाहिलेस माझ्यात

1 min
933



काय पाहिलेस माझ्यात


बुद्धीवान,सहनशील,व्यापकता

तळहातावर जपण्याचे बळ तुझ्यात

सहचर असा दुर्मिळ कलियुगात

नको विचारु..काय पाहिलेस माझ्यात।



राजबिंड्या रूपाचा गर्व नाही

पुरूषाचे सौंदर्य असते कर्तृत्वात

माझ्यातल्या स्त्रीत्वाचा आदर करण्याचे

अमूल्य सामर्थ्य पाहिले तुझ्यात।


समर्थ पिता लेकरांचा नेहमीच

मातापित्यांना जपणारा श्रावणबाळ

प्रियकर माझा जगावेगळा

संस्कारांशी जुळलेली सदैव नाळ।



सात्विक विचारांचे आत्मिक बळ

माणूस जोडण्याचे तुझे कसब

समाजसेवेत झोकून देणारे मनोबल

माणुसकीचे तू रसायन अजब।



सुखदुःखात साथ देण्याची ग्वाही

खांदयाचा आधार भक्कम भावविश्वात

तुझ्याविण जगणे अशक्य वाटते

नको विचारू..काय पाहिलेस माझ्यात।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance