काव्यांजलीः सहवास तुझा
काव्यांजलीः सहवास तुझा
सहवास तुझा
सोबतीस तु नव्हता
संपला वंसत
आता.
सहवास तुझा
भेटण्याची मजला आस
दाखवू कुणास
मन्मना
सहवासाने तुझ्या
आंनदात या विरघळले
दु:खात तळमळले
तुजसाठी
सहवासाने तुझ्यात
मन माझे हर्षले
धुंद झाले
सख्या
सहवास तुझा
तुच माझा आधार
करते निरंतर
प्रार्थना
तुझा सहवास
प्रेमात तुझ्या समर्पण
गंधाळले क्षण
सोबत