काव्य
काव्य
काव्य दिनाचे
औचित्य साधले
शब्द ते शोधले
कवी मनाचे
आषयघन
विषय वेगळे
शोधले सगळे
गुंतले मन ...
देवा समोर
ओतले भांडार
तोच तो आधार
मन विभोर ...
प्रेम सागर
ती जननी माता
भगवंत त्राता
जोडते कर ...
निसर्गातली
वेचली मी फळे
शब्दातुन कळे
हसली कळी...
कवी सामर्थ्य
शब्दात वसले
कसे भुलवले
आगळा अर्थ ...
