STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

काठी म्हातारपणाची

काठी म्हातारपणाची

1 min
234

अशी वेळ येऊ नये 

कधी काळी कुणावर

दृश्य डोळ्याने पाहता

अश्रू होती अनावर


पदरात  दोन  मुले 

आई विना सांभाळले

स्वतः भाकरी थापून

खाऊ मुलांना घातले


अंगावर,  खांद्यावर

खेळविले  रातदिस

मुलांसाठी वडिलाचा

जीव होई कासावीस


स्वप्ने किती रंगविली

मुले होतील महान

काठी म्हातारपणाची

जपतील माझा मान


सारे उलटे  घडले

स्वप्न कशाने भंगले

वृद्धपणी वडिलांचे

वाटे करून घेतले


भूक लागता पोटाला

सूना देईना  खायाला

कुत्र्या पुढची भाकरी

खावी लागली बापाला


नको व्यर्थ फुशारकी

नको मुलांचा विश्वास

हित आपुले साधावे

घ्यावा शेवटचा श्वास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy