STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

3  

Dilip Yashwant Jane

Tragedy

काटा

काटा

1 min
337

रुते काटा काळजात

मन मनात आक्रोश

दावू वेदना कुणाला

कोठे मिळेल प्रकाश


डोळा पूर आसवांचा

कसा घालावा रे बांध

दुरावल्या नात्यानांही

मन मना तूच सांध


अहं धरून मनात

अंहकार विसावला

नादी लागून माणूस

माणूसकी विसरला


मर्म नात्यांचे सर्वांना

हळूवार ते कळावे

वेदनांना जाणावया

हवे मनही हळवे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy