कासव
कासव
हळूहळू चाले परी
मऊमऊ भासे,
आई मला स्वप्नी
रोज कासव दिसे.....
चोरूनिया अंग किती
घाबरूनी चाले,
गर्व नाही जराही
म्हणूनी जिंकले....
कासवाच्या पाठीवर
घर का गं त्याचे,
जाऊ का मी सोबतीला
बाबा रागावतील त्याचे...
इवल्याशा कासवाशी
दोस्ती मला करायची,
तलावाच्या काठावर
हळूहळू चालायची....
हळवे ते कासव
रोज येई स्वप्नात,
डुलत,डुलत मी ही
रंगूनी थाटात....
