कांदा भाकर
कांदा भाकर
आवड खाण्याची मला कांदा भाकर
मेहनत करतो मी ना कुणाचा नोकर
दिनरात मी शेतात घाम गाळतो
कष्ट करून मला आनंद मिळतो
थकून जाईना जरी लागली ठोकर
काळी माती आहे माझीच राणी
कणकणात तिच्या माझी कहाणी
हिरव्यागार पिकांचा हो मी चाकर
परिवारासाठी असतो सदा मोकळा
माझी मलाच ठाऊक काय आहे कळा
दुःखातही हसतो समजू नका जोकर
माझ्या गावात आहे माझा इतिहास
काळ्या रानी बसून खातो संगम घास
माझं जग माझं शेत नाही मी हो बेकार
