कामगार
कामगार
पहाट होताच लागतात कामाला
नाही काही आराम,
नाही कुठला विश्राम
मेहनत करून जीवन स्वतःचे घडवती कामगार
दिवसा कधी कधी रात्रीही राबून
पार पाडतो आपली चाकरी
अविरत कष्ट करून
मिळवितो भाकरी
प्रामाणिक राहून
कामगार काम करी
कारखान्याची व्यवस्था त्याच्यामुळे आहे बरी
निर्मितीची शक्ती त्याची
असे राष्ट्राचा आधार
निर्माण करतो उज्ज्वल भविष्य
उद्दिष्ट करितो साकार
कष्टाला त्याच्या समजावे
मोल योग्यते घामाचे
त्याच्या पदरी घालावे
वाटे, हाताला मिळो काम सर्वदा
कार्याला त्यांच्या सन्मान
परिश्रम खरे वैभव मानतात कामगार
अभिमान वाटतो त्यांच्या कारागिरीचा
जिद्द, चिकाटी, मेहनतीला करावा वाटे प्रणाम👏🙏
