STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

3  

Varsha Shidore

Inspirational

कामगार समतेचा...

कामगार समतेचा...

1 min
12K

कामगाराच्या अभागी जीवनातल्या 

कष्टाची कुणा नाही कशी हो जाण...

ज्याच्या घामाने पवित्र भूमी साकार 

आसवांचा ठेवा सदा त्याच्या मान... 


देह त्याचाही असे हर एक मानवासम

तो नाही गुलाम कुणाच्याच पैशाचा... 

त्याच्या मनामनात त्यागाचा बहुमान 

सदा स्वतःच्या स्वाभिमानी रक्ताचा... 


तो राबतो म्हणून आपला उदरनिर्वाह 

त्याचा मायेने मनोमनी राखावा आदर... 

निष्ठावंत संविधानाची समता आठवून 

नको भावनांचा त्याच्या उगाच अनादर... 


रंगभेदाची नको अत्याचारी वागणूक 

अमानुष मानसिकता आता बदलावी... 

निस्वार्थी न्यायाची नैतिक मूल्ये जपून 

माणुसकीची मौलिक संस्कृती घडावी... 


कामगारांची व्यथा जाणून रत्नास वंदन

कामगार दिन करावा उत्साहात साजरा... 

या कर्मभूमीस घडवणाऱ्या कष्टकरी 

वारशाच्या परिश्रमास मानाचा मुजरा... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational