STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

कामगार दिन

कामगार दिन

1 min
32.4K


आहे एक मे तारीख

आज कामगार दिन

सुटी घ्या नि मजा करा

सर्व काळजी सोडून


राब राबून नेहमी

पार पाडतो चाकरी

असे एकच ठाऊक

हवी पोटाला भाकरी


मुलं बाळं सांभाळाया

स्वतः कष्ट उपसतो

घाम गाळतो म्हणून

घरा दाराला पोसतो


त्याच्या काबाडकष्टाला

कुणी समजून घ्यावे

मोल योग्य ते घामाचे

त्याच्या पदरी घालावे


प्रामाणिक राहूनिया

कामगार काम करी

कारखान्या ची अवस्था

त्याच्यामुळे आहे बरी


आज काय स्थिती झाली

झाला कामगार "दीन"

मान सन्मान द्या त्याला

एक माणूस म्हणून


नाही ऐरा गैरा कोणी

राबणारा कामगार

निर्मितीची शक्ती त्याची

असे राष्ट्राचा आधार



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational