काळजावरील दगड
काळजावरील दगड
मातीचे घर हे माझे
मराठी मातृभाषेची गाथा.
इंग्रज सोडून गेलेत ही,
इंग्रजी अन्,दगडा विटाचा माथा.
गळेचेपी ही चाले,
काना मागून येणाऱ्याची.
माणसात माणूसकी ही झाली,
काळजाच्या दगडाची.
ज्याला त्याला संभाळतोय,
महाराष्ट्राची ही माती.
विसरून जातीभेद अन् नाती,
चारतोय साऱ्याना हो मोती.
परप्रांतीयाचे लोंढे,
करू लागले दादागिरीचे राज.
जन्म गेला ज्या मातीत,
तोच घर, नोकरीस मोहताज.
ज्याला त्याला असावा,
आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान.
खालेल्या देशाच्या मीठाची,
राखून, ठेवावा अभिमान.
साद घालते ही मराठी मातृभाषा.
मराठी माणूस एकत्र येऊ शकतोय.
माझ्या मराठीच्या रक्षणास,
एकत्र येऊन रणांगण पेटवून लढतोय.
