काळजात उगवते!
काळजात उगवते!
काळजात उगवते,
माया, आईच्या, लेकरा!
चोचीनेच भरवते,
एकेक दाणा, पाखरा !!
काळजात उगवते,
बीज मातीच्या लेकरा;
तेव्हा घास तो अन्नाचा,
मिळे पोटभर पोरा!
काळजात उगवते,
फूल प्रीतीचे पामरा !
गूज मनी करून ते;
वाढे अंतरी भरारा !!
काळजात उगवतो,
आकाशगंगेच्या तारा !
ब्रह्मांडाला उजळतो;
देई प्रकाश पिसारा !!
