काही तरी सांगायचे मला
काही तरी सांगायचे मला
काही सांगायचे आहे मला,
पण, सांगू कसे हे कोणाला.
भावना मनातच गोठल्या,
कसे बांध लागले शब्दाला.
मला सांगायाच आहे खुप,
खुप बोलायच आहे मला.
आज ना जाने का मुक्का झाला,
प्रश्न आता हा पडला मला.
खुप काही व्यक्त होण्याआधी,
मानात विचार घोळतात.
काय वाटेल कोणाला हिच,
गणित मनाला पडतात.
कधी भावना उदास होते,
कधी थांबते मनातच ती.
कधी घेते अंदाज मनाचा,
कधी थांबते होटातच ती.
शब्द मनातले सांगायचे,
सांगायचेच राहुन गेले .
बोलता बोलता एके दिवशी,
बोलण्याचे ते राहून गेले.