STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Classics

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Classics

काही खरे नाही

काही खरे नाही

1 min
367

मृग संपले तरी पावसाचा थेंब नाही

यावर्षी पावसाचे काही खरे नाही


शेतात पेरले बियाणे पण पाऊस नाही

यावर्षी पिकांचे काही खरे नाही


कर्जाने आणले बियाणे उगवलेच नाही

यावर्षी जगण्याचे काही खरे नाही


भरवश्याचे शेतीत काही फायदा नाही

यावर्षी शेतकऱ्यांचे काही खरे नाही


खायला काय जर उत्पन्न झालें नाही

यावर्षी माणसांचे काही खरे नाही


आवक घटेल समृद्धी होणार नाही

यावर्षी देशाचे काही खरे नाही


चिंताजनक परिस्थिती कुठे आनंद नाही

यावर्षी कोणाचे काही खरे नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics