का ?
का ?
भावनेच्या किनारी
झाकोळलेल्या क्षणी
एक लाजरी चंद्रकोर
वास्तवाची चौकट पांघरूण
अज्ञानाच्या पोकळीतून वाट काढत
झिरपणा-या रात्रीतल्या एकांताला साधत
आषाढी मेघांचे टाळ वाजवत
झुळूक, वारा, वादळ पाठीवर घेऊन
मुक्त चिमण्यांचा चिवचिवाटाला मनात झिरपवत
लांब लांब चालत इथंवर पोहोचलीस
पण......
या किनाऱ्यावर मात्र
तू इथं भेटशीलच याची खात्री काय ??
कारण इथल्या सावल्या तर
आताशा स्तंभित झाल्यात
संवाद भावनांचे मौन झालेत
तरीसुद्धा तू ऋतूची कहाणी स्वतःलाच सांगत
इथंवर पोहोचलीस ......
पण का ????
का ???
