STORYMIRROR

Varsha Kendre

Inspirational

2  

Varsha Kendre

Inspirational

ज्योतिराव फुले यांना पत्र लेख

ज्योतिराव फुले यांना पत्र लेख

1 min
143

 प्रति,

आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले.

धनकवडी ,पुणे.

               विषय-  सामाजिक प्रश्न उपस्थित करणे बाबत.


 सन्माननीय,

      साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की, आपण महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान व्यक्ती आहात. आपण बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत आहात. महिलांच्या कल्याणार्थ आपण विधवा पुनर्विवाह, स्त्री पुरुष समानता, महिला साक्षरता अशा विषयांवर सतत कष्टत राहिला आहात.

      आज समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता ही फक्त लिखित रुपात दिसते. आजही स्त्रियांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो. स्त्रियांना मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते. पदोपदी आम्हा महिलांना आपली आठवण येते. स्त्रियांच्या कल्याणार्थ आपल्यातील ज्योतिबा आम्हा स्त्रीयांना प्रत्येक पुरुषात पहावयाचा आहे. वरील प्रश्नांना समाजातून कायमचे हटवण्यासाठी आज आपल्या स्मृतिदिनी आम्ही महिला आपल्या विचारांची मशाल हाती घेऊन सज्ज झालेले आहोत. आपण आपल्या विचारांनी अजरामर झालेले क्रांतिसूर्य महात्मा आहात.  आमच्यासारख्या सावित्रीच्या लेकींना आपल्या विचारांची साथ हवी आहे.

 जय हिंद, जय भारत!

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational