STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

जय मानवाचा

जय मानवाचा

1 min
224

अरे सांग कोरोना सांग आता 

किती छळणार आहे 

चिल्या पिल्यांचे छत्र

 किती संपवणार आहे 


तुझ्या भितीमुळे शहर सोडले 

गावात येऊन माझे काम सुटले 

जगण्याचे माझे आता हाल झाले 

दु:ख डोळ्यांनी मी सारे पाहिले 


शहर सोडले मी गाव सोडले 

रान शोधले मी,वन शोधले 

कुठे लपावे आता,आम्हां ना कळे 

तुझ्या भीतीपोटी सारे मार्ग खुंटले 


जगाचे जीवन तू असताव्यस्त केले 

सार्या जगाला सतावून सोडले 

घरातच मानवाला बंदिस्त केले 

मोकळ्या श्वासाला गुलाम रे केले 


काय तुझी भयानक लाट पसरली 

वाटले नव्हते एव्ह्ढी हानी करशील

जीवाची माणसे अचानक नेशील 

त्यांच्या जाण्याचे दु:ख देशील 


आता तरी तुला दया येऊ दे 

गोरगरीबांना सुखाने जगू दे 

पिडा नको तुझी आम्हांला 

फक्त सुख,शांतीने राहू दे 


आई गेली,बाप गेला 

पत्नी गेली,नवरा गेला 

मागे अनाथ केली मुलेमुली 

सांग असा कसा रे घाला


ऐक कोरोना ऐक आता 

तुझे लई अती झाले रे थैमान 

नियतीला आता नाही बघवणार 

एक दिवस तुझे नक्की येणार मरण 


येणाऱ्या पापाला सामोरे जा 

निरपराध जीवांचा घेणार बदला 

सहन करणार नाही रे तुला 

माफ करणार नाही रे तुला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational