जय अण्णा जय लहुजी
जय अण्णा जय लहुजी
जय लहुजी! जय अण्णा!
पेटली मशाल आता
उठला समाज पेटून,
जाब विचारतो शासनाला
हिंमतीने एकवटून...
नव्हता झोपला कधी
होता भ्रम जगाचा,
इतिहास आहे साक्षीला
फकिरा, लहुजी वाघाचा.
उठले जोमाने वादळ हे
आता मुळी थांबणार नाही ,
कुठवर पाहता अंत आमचा
आता काहीच जमणार नाही.
लढू आम्ही न्यायासाठी
किती सोसावा अन्याय,
उठला, पेटला समाज सारा
आम्हा कुणाची नाही गय.
ऊठा घेऊन झेंडे हाती
गाजवायला आझाद मैदान,
एकजुटीने, सामर्थ्याने
करु यशस्वी आंदोलन...
घेऊन शपथ ऊठा गड्यांनो
अण्णा, फकिरा, लहुजीची,
विजय पताका फडकवू या
जिंकू लढाई अस्तित्वाची...
जय लहुजी !जय अण्णा !
होऊ द्या एक ही गर्जना,
संघटन, संघर्षाचा मंत्र
प्रत्यक्ष आणू आचरणा....
गायकवाड आर.जी.दापकेकर
९८३४२९८३१५
