STORYMIRROR

Panditji Warade

Inspirational

4  

Panditji Warade

Inspirational

जुन्या नव्याची सांगड

जुन्या नव्याची सांगड

1 min
371

प्रॉम्प्ट-७ साठी


नको संघर्ष कधीच

मुळी जुन्याशी नव्याचा

कधीकाळी तोही होता

नव्या कोऱ्या धाटणीचा।।१।।


आयुष्याच्या वाटेवर

टक्के टोणपे खाऊन

संघर्षाचे जिणे त्याचे

निघे जीवन तावून।।२।।


जुन्या चालीरीती रूढी

त्याचे अनुभवी बोल

छोट्या म्हणी सांगतसे

अर्थ जीवनाचा खोल।।३।।


नवे सारे काही खोटे

नच मानावे जुन्यांनी

नवे तंत्र नवे ज्ञान

सुखी जीवन कहाणी।।४।।


जुन्या नव्याची सांगड

सुखी जीवनाची चावी

तीच आनंदाची खाण 

सदा ध्यानात ठेवावी।।५।।


पंडित वराडे, औरंगाबाद

०८.०५.२०१९


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational