जुगार
जुगार
बागेतील मोकळे ठिकाण
जुगारांचा अड्डा ठरलाय
शंभर,पाचशे, हजारचा
जुगाराचा सत्ता लावलाय
रम्मी,मेंढी कोठ,तीन पत्ती
अशा पत्ताचा डाव रंगला
विजेता मी म्हणून खुशीने
माझा पैशाने खिसा भरला
कामाला जातो म्हणून निघतो
पण कामावर काही जात नाही
सत्ता वर सत्ता लावत गेला
जिंकण्याची संधी भेटत नाही
सगळी धनदौलत सोनेनाणे
त्या जुगारात घालवले
जिंकलो काहीच नाही मी
सगळे काही गमावले
लेकरा बाळांसाठी ठेवलेला पैसा
आज जुगारात उडवला
चहात बुडवायचा पाव तर त्यांने
फक्त पाण्यातच बुडवला
संसाराच वाटुळ केल जुगाराने
आता मला जरा समज आली
कधी काळी श्रीमंत होतो मी
आता परिस्थिती गरीबांची झाली
