STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Children

3  

दिपमाला अहिरे

Children

जत्रा

जत्रा

1 min
586

चैत्र पौर्णिमेची सुरवात होता

 चाहूल लागते जत्रेची.

कुणी म्हणते उरुस,कुणी म्हणते यात्रा.


आजही आठवते लहानपणीची

जत्रेची मजा मामाच्या गावची.


नदी शेजारील मोकळ्या मैदानी

सजती दुकाने रंगबिरंगी.


गरमागरम जलेबी गुळाची

कुठे कांदा भजी खमंग वासाची.


रेवडी,शेव,ओली भेळ,कुठे कलिंगडाची थंडाई

पिंपळाच्या खेळणी सजत असतो बाजार.


लहानग्यांची लगबग खेळाची

हातात असते दोरी फुग्याची

पण तरीही नजर शोधते बाहुली मोत्याची.


उंच उंच गरगर पाळणे खुणावती

जादुचा खेळ पाहण्याची असते वेगळीच नवलाई.


माहेरवाशीण पोरी आणि पाहुण्यांनी सजती घरे

तुडवुन दिवसभर जत्रा भारी

दमुन जात असे मंडळी सारी.


जरा विसाव्यासाठी खुणावत असे ती रसवंती

रात्रीची पाहण्यासारखी असते रोषणाई.


कुठे कुस्तीचे फड रंगती

तमाशाचे फड असती मनोरंजनासाठी 


जत्रेच्या त्या गमती जमती आठवणी

आजही घेऊन जातात बालपणी!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children