जपूनी ठेव...
जपूनी ठेव...
हे मानवा.....
पहाट होताच गोड
किलबिल करती पाखरे....
कानी हा मधुर आवाज जपून ठेव सारे..
आता येती बागडत अनेक भवरे...
सुंदर सुगंधित उमलणारी फुले,
तुमच्या मधील अमुल्य मध हे,जपून ठेव सारे...
येती उन्हाळा प्रखर होती किरणे..
लावूनी झाडे असंख्य, सावलीतले सुख जपून ठेव सारे...
आटत आहेत, विहिरी, नदी, नाले...
पाणी आहे मोलाचे, कमी वापरुन जपून ठेव ना रे...
संपत आहे माणुसकी,
अत्याचार, भ्रष्टाचार ह्याचे वाहत आहे वारे...
पाप पुण्य चा हिशोब वर होत असे,
जपून कर सारे...
जन्म हा मानवाचा, एकदाच मिळतो रे...
गुरू चरणी कर अर्पण जीवन आपले,
गुरू जप करू सारे...
