STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

3  

Prashant Shinde

Abstract

जोडे

जोडे

1 min
206

जोडे...

चाहूल ...

पैलतीर...

वास्तव...

प्रगती...की अधोगती...


अधोगती

चाहूल चालीची

घायी पैलतीर गाठण्याची

जाण वास्तवतेची


प्रगती ध्येयाची

मंदगती प्रयत्नांची

कैफियत जीवनाची


पेढे वाटतो बाप गावभर

म्हणे झाडाला फुटला कोंब

जोडे मारतो लेक बापाला

घरोघरी उठली बोंब


पेढे वाटलेस गावभर

म्हणे आता मार बोंब

पोटात भुकेचा उठता

भर दुपारी आगडोंब


उंबरठ्यावरी उभा बाप

घालवीन जीवन इथेच म्हणे

पोटभर मिळत नव्हे त कधी

दात असता शाबूत, चणे


हे का केले नाही

ते का केले नाही

फसले मी येऊन घरी तुमच्या

घरवाली सदा म्हणे


हे करू नका

ते करू नका

बाहेरही जाऊ नका

म्हणती काढून उणेदुणे


श्रमलो खपलो जन्मभर

डोईवरी झाला मोठा भार

फुकट खातो म्हणती सारे

डोक्यास वाटे फुकाचा कार


मुसक्या बांधल्या दैवाने म्हणे

वाटते हे रे देवा कसले जीवनगाणे

नको वाटते कसरत करणे

अन परावलंबी असले उपरोधिक जीणे


चप्पल पायीचे लहान होता

लेक बापास त्या मोठा वाटे

मूग गिळूनी बसतो म्हणे

आता जग झाले माझे छोटे

        जग झाले माझे थिटे.......!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract