ज्ञानसंपदा
ज्ञानसंपदा


पुस्तकाने फुलविला ज्ञानाचा मळा
पुस्तकाने लावला वाचनाचा लळा
पुस्तकाने घडविले आचार विचार
पुस्तकातून समजले कितीतरी सुविचार
संगतीत पुस्तकाच्या रम्य होते जीवन
दुःखी कष्टी असताना रमते मन
पुस्तकातून खुलते ज्ञानाचे भांडार
मिळवता येतो कलागुणांचा समाचार
पुस्तकामुळे बहर येतो जीवनात
पुस्तकामुळे आकार येतो आयुष्यात